रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आदेश जारी

0
14

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रराज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक
13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतुने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे व दिवसेंदिवस कोरोना विषाणूने बाधीत व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे अशी माझी धारणा झाली असल्याने निर्गमित केलेल्या आदेशामध्ये समावेशासह सुधारणा करणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी खालील प्रमाणे समाविष्ठ बाबींसह पुरवणी आदेश निर्गमित केले आहेत. आदेश

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धा उदा. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इ. यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय भरविण्यास मनाई करण्यात येत आहे.

स्थानिक प्राधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, भरवता येणार नाहीत.

कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ साखरपुडा, मुंज, पुजा, आरती, नमाज इत्यादी ज्यामध्ये 50 च्या मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

उदयाने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रिडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाच वेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास या आदेशाव्दारे मज्जाव करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशास अनुसरुन या कार्यालयाकडील वाचले क्र. 1 च्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे अटी शर्तींवर खुली करणेस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा, जत्रा, ऊरुस भरविण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज प्राप्त होत आहेत असे निदर्शनास आले आहे. तथापि या कामी रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरुस यांमधील फक्त धार्मिक विधी करण्यास 50 माणसांच्या मर्यादेत परवानगी देण्यात येत आहे. तथापि, याकामी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यात विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविणेस मनाई करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत रात्रौ 09.00 ते सकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी व वैदयकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

0000

मास्क न घातल्यास 500 ₹ दंड
रत्नागिरी दि. २३ :शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोटकलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. यापुर्वीच क्र./ससाशा/कार्या-13/करोना विषाणू/परवानगी/2020 दि. 28 एप्रिल 2020 अन्वये रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करुन चेहऱ्यावर मास्कचा वापर न केल्याचे दिसून आलेस अशा व्यक्ती कडून रुपये 500/- (अक्षरी- पाचशे रुपये)दंड आकारण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढु लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्याअनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढु लागल्याने त्याला आळा घालण्यासाठी मला प्राप्त अधिकारानुसार खालील प्रमाणे आदेश करीत आहे.

आदेश
१) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणे, सर्व आस्थापना, सर्व समारंभ/कार्यक्रमाचे ठिकाणी मास्क

वापरणे बंधनकारक राहिल. केवळ मास्क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे, किंवा योग्य रितीने वापर न
करणे या बाबी सुध्दा मास्कचा वापर न करणे या प्रमाणे समजण्यात येईल.

२) मास्क न वापरणारे यांचे विरुध्द 500/- रुपये दंड आणी प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करणेत येईल.

३) मास्क न वापरणारे यांचे विरुध्द दंडात्मक कारवाई करणेसाठी स्थानिक प्रशासन (नगरपंचायत-नगरपरिषद/

ग्रामपंचायत) तसेच पोलीस प्रशासन यांना सक्षम प्राधिकारी म्हणून या आदेशान्वये प्राधिकृत करणेत येत आहे.

४) तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही त्यांच्याकडील खात्यात जमा

करावयाची आहे. नगरपंचायत / नगरपरिषद प्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही

त्यांच्याकडील खात्यात जमा करावयाची आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत / नगरपरिषद प्रशासनाने दंडातून

प्राप्त झालेल्या निधीचा वापर कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करावयाचा आहे. पोलीस

प्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही वाहतुक शाखेच्या खात्यात जमा करावयाची आहे व

जमा रकमेपैकी 50 टक्के निधी हा District Disaster Response Fund, State Bank Of India, A/C No. 38263416984, IFSC Code – SBIN0000462 या जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचेकडील खात्यात जमा करावयाचा आहे.

५) सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 आणि महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना नियम 2020, मुंबई पोलीस अधिनियम 1951 आणि शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक 22/02/2021 रोजी मध्यरात्री 12.00 वा.

पासून ते या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील. असे आदेशात म्हटले आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here