कोकण रेल्वे मार्गावर दोन विकेंड स्पेशल २६ फेब्रुवारीपासून धावणार

0
14

कोकण रेल्वे मार्गावर दोन विकेंड स्पेशल २६ फेब्रुवारीपासून धावणार आहेत. यातील एक गाडी लोकमान्य टर्मिनस ते मडगांव तर दुसरी मडगांव -पनवेल दरम्यान चालवण्यात येणार आहे.
लो. टिळक टर्मिनस-मडगांव विकेंड स्पेशल गाडी (०११०१) दि. २६ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत दर शुक्रवारी ८ वा. ५० मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वा. ५५ मिनिटांनी गोव्यात मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगावहून ही गाडी (०११०२) दि. २८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत सायंकाळी ४ वा. सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे ३.४५ वा. मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.
बावीस डब्यांची ही गाडी करमाळी, थीवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, खेड, माणगांव तसेच रोहा, पनवेल तसेच ठाणे स्थानकावर थांबणार आहे.
दुसरी विकेंड स्पेशल गाडी मडगांव-पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी (०११०६) दि. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत दर शनिवारी दुपारी १२ वा. सुटून त्याच दिवशी रात्रौ साडेदहा वाजता पनवेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०११०५) दि. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत पनवेलहून दर शनिवारी रात्री ११.५५ वा. सुटून मडगावला दुसर्‍या दिवशी ११ वाजता पोहचेल.
बावीस डब्यांची ही गाडी करमाळी, थीवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, खेड, माणगांव व रोहा स्थानकावर थांबणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here