सद्य परिस्थिती पाहता आता देशाला दुसऱ्या पर्यायाकडे जाण्याची वेळ -नितीन गडकरी

0
53

देशात सध्या इंधनाच्या वाढत्या दरावरून जनसामान्य माणसांत रोष आहे. सद्य परिस्थिती पाहता आता देशाला दुसऱ्या पर्यायाकडे जाण्याची वेळ आली आहे. मी आधीपासूनच विजेचा इंधन म्हणून वापर करण्याचा प्रसार करत आहे. कारण भारतात अतिरिक्त विजेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
तसेच, आपण भारतात 81 टक्के लिथियम बॅटरी बनवत आहोत. माझ्या मंत्रालयाने आज लिथियम आयनला पर्याय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारशी संबंधित सर्व प्रयोगशाळा यावर संशोधन करत आहेत. इंधनासाठी मंत्रालय हायड्रोजेन सेल्सच्या पर्यायाची देखील चाचपणी करत आहे, असे देखील गडकरींनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here