आता Amazon नं आपल्या रिजनल नेटवर्कचा विस्तार करत मराठी भाषेत आपली सेवा सुरू केली

0
54

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं Amazon ला मराठी भाषेमध्ये सेवा सुरू करण्यासंदर्भात इशारा दिला होता. मनसेच्या दणक्यानंतर आता Amazon नं आपल्या रिजनल नेटवर्कचा विस्तार करत मराठी भाषेत आपली सेवा सुरू केली आहे. कंपनीनं रविवारी यासंदर्भातील घोषणा केली. तसंच सध्या विक्रेते मराठी भाषेचा वापर करू शकतात असं Amazon कडून सांगण्यात आलं आहे. “मराठी भाषेत सेवा सुरू केल्यानं ई कॉमर्सद्वारे लाभ घेण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील लाखो व्यवसायिक, एमएसएमई, स्थानिक दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांना येणारा भाषेचा अडथळा आता दूर होईल,” असं कंपनीनं म्हटलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here