पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला ३१ जानेवारीपासून देशभर सुरूवात झाली. मात्र पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील घाटजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादर्यान लहान मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आलं आहे. १ ते ५ वयोगटातील ही मुले आहेत. सॅनिटायझर पाजलेल्या १२ लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरूवातीला मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एन देवेंदर सिंग यांनी रात्री रूग्णालयात भेट देवून मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली.
www.konkantoday.com