मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा परिसरातील अपघातांची मालिका सुरूच
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा परिसरातील अपघातांची मालिका सुरूच असून, हातखंबा दर्ग्याजवळच रात्री ट्रक उलटून दुसरा अपघात झाला. त्यात तिघेजण जखमी झाले आहेत तर शुक्रवारी सकाळी कापडगाव बसथांब्याजवळ आणखी एक ट्रक उलटून अपघात झाला आहे. यावेळी सुदैवाने दुचाकीस्वार दुसरीकडे गेल्याने बालंबाल बचावला.
www.konkantoday.com