रिफायनरी प्रकल्प समर्थक संघटना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट व्हावी यासाठी आपण स्वतः पवार साहेबांना विनंती करु-खासदार सुनील तटकरे

0
27

रिफायनरी प्रकल्प समर्थक संघटना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट व्हावी यासाठी आपण स्वतः पवार साहेबांना विनंती करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले.ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार तटकरे म्हणाले की, राज्यातल्या तसेच देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या संघटना पवार साहेबांना भेटत असतात, त्यामुळे पवार साहेबांची भेट घेण्याची इच्छा प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या संघटनांची असेल, तर पवार साहेबांनी जरूर त्यांना भेट द्यावी, अशी विनंती आपण त्यांना करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
अनुकूल, प्रतिकूल असे मतप्रवाह जेव्हा तयार होत असतात, तेव्हा जेष्ठ नेते देशाचे नेते म्हणून पवार साहेब, असे प्रश्न समजून घेत आलेले आहेत. त्यामुळे, यांची भूमिका देखील ते समजून घेतील. पवार साहेबांशी प्रकल्प समर्थकांची भेट घडवून आणण्यासाठी मी दुवा नक्की बनेन, पण नाणार प्रकल्प या राज्यात आणायचा की नाही, हे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवेल, असे तटकरे म्हणाले.
www.konkantodday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here