कोरोना वॉरियर्स नर्सेसचे योगदान महत्वाचे- माजी आमदार बाळ माने

0
22


कोरोना (कोविड-19) महामारीचा सामना करताना डॉक्टरांसोबत नर्सेसचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेत नियोजन केले. त्यामुळेच कोरोनाच्या संकटातून आपण वाचलो. आता मेड इन इंडिया लसही आल्यामुळे कोरोना हद्दपार करण्यात यश मिळेल. भविष्यात नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस असून आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त, माजी आमदार बाळ माने यांनी केले.
दि यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी सहव्यवस्थापकीय विश्‍वस्त मिहिर माने, विराज माने, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन बाळ माने यांनी यांनी नर्सिंग कॉलेजच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोरोना काळात जाणीवपूर्वक काम केल्याबद्दल कौतुकही केले.
श्री. माने पुढे म्हणाले की, मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नर्सिंग कॉलेजही बंद झाले. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे नर्सिंगचे सर्व विद्यार्थी शिकत राहिले. अन्य अभ्यासक्रम कमी केले असले तरी नर्सिंगचा अभ्यासक्रम कमी करून चालणार नाही. त्यामुळे आता कोरोनाचे नियम पाळून पुन्हा महाविद्यालय सुरू झाले आहे. महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व तज्ञांच्या सल्ल्यानुसार सकस आहार, जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नर्सिंगचे सर्व विद्यार्थी सुदृढ, सशक्त होतील.
श्री. माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या विकासयोजनांचाही आढावा घेतला. नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. त्यामुळेच दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या शेजारीच विद्यार्थिनी वसतीगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येणार्‍या विद्यार्थिनींना शिक्षणासह निवासाची सुविधाही मिळणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here