खेळाडूंसह क्रीडा क्षेत्रात स्वारस्य असलेल्यांसाठी रत्नागिरी क्लबची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाणार-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

0
80

. खेळाडूंसह क्रीडा क्षेत्रात स्वारस्य असलेल्यांसाठी रत्नागिरी क्लबची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी वगळता बहुतांशी शहरामध्ये स्वतंत्र क्लबची स्थापना करण्यात आली आहे. तीच संकल्पना अल्पबचत इमारत जमीनदोस्त करून लवकरच राबविली जाणार असल्याचे श्री. मिश्रा यांनी सांगितले. रत्नागिरी क्लब या नावाची संकल्पना क्रीडा विभागाचे अनुदान, लोकसहभाग यातून राबविली जाणार आहे. क्लबच्या कायमस्वरूपी सदस्य पदासाठीचा दर निश्‍चित करून त्याद्वारे आवश्यक निधीची उभारणी करण्यात येईल. रत्नागिरी क्लबच्या इमारती इनडोअर गेम, जलतरण तलाव, मिटिंग हॉल, लग्नासाठी स्वतंत्र सभागृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे श्री. मिश्रा यांनी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here