फेसबुकवरून मैत्री करून विदेशी महिलेने दापोलीतील एकाला घातला ११लाख६० हजार रुपयांचा गंडा
जेसिका नॅन्सी नाव सांगणार्ंया विदेशी महिलेने आपण अमेरिकन सैन्यात नोकरीला असल्याचे भासवत फेसबुक वरून चॅटिंग करून दापोलीतील एका इसमाला ११ लाख ६० हजार रुपयांचा गंडा करण्याचा प्रकार घडला आहे याबाबत दापोली जलगाव येथील सुनील भावे (५७)यांनी दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून फिर्यादी याचबरोबर आपल्या फेसबुकवरून जेसिका नॅन्सी या विदेशी महिलेने मैत्री केली चॅटींग मधून ओळख झाल्यानंतर आरोपी महिलेने ती अमेरिकेची रहिवासी आहे व अमेरिकन सैन्यात असल्याचे सांगितले आरोपी हिने सध्या आपण अफगाणिस्तान येथे असून तिथे मिशन पूर्ण करण्यासाठी आलेली आहे मिशन पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन राहणार आहे असे सांगून फिर्यादी यांच्याशी मैत्री निर्माण केली फिर्यादी यांना वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या अकाऊंट मधून आपल्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांच्या वेगवेगळ्या अकाऊंट मधून ११ लाख ६० हजार रुपये रक्कम भरायला लावले फिर्यादी यांनी ही रक्कम भरली परंतु त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी दापोली पोलिस स्थानकात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे
www.konkantoday.com