रत्नागिरी : गणपतीपुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने काही जणांकडून खोट्या बातम्या पसरवत संभ्रमाचे वातावरणात निर्माण केले जात आहे; त्या पार्श्वभूमीवर अधिकृत फाटक पॅनलने खुलासा केला आहे
कै. ब.ज. फाटक यांचे गणपतीपुळे मध्ये ग्रामपंचायत आणण्यासाठीचे मोठे योगदान आहे. कै. ब.ज.फाटक यांचे मुख्य उद्दिष्ट गणपतीपुळ्याचा कारभार गणपतीपुळ्यातुन चालावा हे होते. परंतु एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या पुढाकाराने गाव-फाटक पॅनल अशी नावे देत व ह्याविषयी बातम्यापरस्पर जाहीर केल्याने मतदार संभ्रमात पडत आहेत. असे प्रयत्न करणे हे कै. ब.ज.फाटक यांच्या मुख्य उद्दिष्टाला काळिमा फासणारे आहे.
याच धर्तीवर सध्या गणपतीपुळ्यातील ग्रामस्थांच्या वतीने अधिकृत फाटक पॅनल कडून प्रभाग १ मधून पंढरीनाथ कृ. पवार, सुप्रिया गजानन ठावरे, प्रतीक्षा प्रमोद चव्हाण, आणि प्रभाग २ मधून राज विलास देवरुखकर, मृणाल महेश घनवटकर व प्रभाग ३ मधून संजय महादेव माने या या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी मतदारांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहन करण्यात करण्यात येत आहे.
www.konkantoday.com