गर्दीच्या हंगामात लॉकडाऊन असल्याने यावर्षी अपघाताच्या संख्येत घट झाली,
अपघात कमी होण्यासाठी दरवर्षी अपघात सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. सुरक्षितता मोहिमेबाबतची जागृती वाढली तर गर्दीच्या हंगामात लॉकडाऊन तब्बल दोन महिने असल्याने यावर्षी अपघाताच्या संख्येत घट झाली आहे. सन २०१९ मध्ये १५८ तर सन २०२० मध्ये ६१ अपघात झाले आहेत.
दरवर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करून चालकांना मार्गदर्शन करण्यात येते. एसटीतील प्रवाशांच्या प्राणाची काळजी घेत असताना सुरक्षित एटी चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. चालकांच्या चुकीमुळे होणारे अपघात अधिक असले तरी अन्य कारणांमळेही अपघात होत असतात. रत्नागिरी विभागात जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत किरकोळ १६, गंभीर ३९ व मृत्यू असलेले ६ मिळून ६१ अपघात झाले आहेत.
www.konkantoday.com