
येत्या दोन दिवसांत राज्यातून पावसाळी वातावरण दूर हाेणार
राज्यावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असले, तरी त्याचा प्रभाव कमी होत असल्याने येत्या दोन दिवसांत राज्यातून पावसाळी वातावरण दूर होऊ शकणार आहे. मात्र, सध्या रात्री आणि दिवसा बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असल्याने किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन उकाडाही जाणवू लागला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन बाष्पाचा पुरवठा झाल्याने प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या आठवडय़ात पावसाळी स्थिती निर्माण झाली
www.konkantoday.com