यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील २४ हजार ३०६ बागायतदारांनी १४हजार ७८८ हेक्टरवरील बागांचा विमा उतरवला
हवामानात होणाऱ्या बदलांचा आंबा, काजू उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदारांना पीक विमा योजना निश्चित लाभदायक ठरू शकते. गेली चार वर्षे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद संमिश्र आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील २४ हजार ३०६ बागायतदारांनी १४हजार ७८८ हेक्टरवरील बागांचा विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावणेचार हजार शेतकरी वाढले असले तरीही विमा उतरवलेले क्षेत्र घटले आहे.
www.konkantoday.com