राजापूर तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये आग

राजापूर तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना आज घडली. नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी भडकलेल्या आगीमध्ये या भागांमधील हजारो आंबा आणि काजूची कलमे जळून खाक झाली आहेत.
संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वाऱ्यासोबत भडकलेल्या आगीचे लोन जैतापूर प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पसरले. त्यामध्ये त्या परिसरातील बागांमधील हजारो कलमे जाळून खाक झाली.विरोधामुळे सध्या या प्रकल्पाचे काम ठप्प आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते त्यामुळे गवताला लागलेल्या आगीमुळे हा प्रकार घडला असावा प्रकार शॉर्टसर्किटमुळे घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे या परिसरात आग विझवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हतीत्यामुळे आग विझवण्यास अनेक तास लागले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button