नाणार परिसरातील नऊशे कोटींच्या जमिनीचे व्यवहार रद्द होणार असल्याची कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांची माहिती
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प विरोधक व प्रकल्प समर्थक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत नुकत्याच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मोठ्या प्रकल्पाबाबत जनसुनावणी करावी असे मत व्यक्त केले होते मात्र याबाबत काेकणशक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी विरोध दर्शविला असून नाणार रिफायनरी बाबतची अधिसूचना रद्द करण्यात आली असून सातबारा वरून एमआयडीसीचे नावही कमी करण्यात आले आहे रिफायनरी प्रकल्प जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात अनेक व्यवहार खाेटे झाले असून त्यामध्ये घोटाळे आहेत यामुळे झालेले जमीन व्यवहार रद्द होणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसा शब्द दिला असल्याची माहिती वालम यांनी दिली आहे
www.konkantoday.com