देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार देशभर कोविड सरचार्ज लागू करणार
कोरोना महामारीत ढेपाळलेली देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार देशभर कोविड सरचार्ज लागू करणार आहे. १फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱया अर्थसंकल्पात याचा समावेश असेल. सध्या केंद्रालाच मोठय़ा प्रमाणावर निधीची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या माथी सरचार्जचा भुर्दंड बसणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
संसदीय व्यवहार मंत्रिमंडळ समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांबाबत मंगळवारी शिफारस केली. त्यावर मंत्रीमंडळ अंतिम निर्णय घेणार आहे.
www.konkantoday.com