डॉ.शुभांगी बेडेकर, राजरत्न प्रतिष्ठानला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी कडून पुरस्कारांची घोषणा
पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एक व्यक्ती आणि एका संस्थेला ” सामाजिक कृतज्ञता” पुरस्कार दिला जातो, यावर्षी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी म्हणून शासकीय रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ शुभांगी बेडेकर आणि मनोरुग्णांसाठी अविरतपणे काम करणाऱ्या ” राजरत्न प्रतिष्ठान ” ला जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांच्या उपस्थितीत ६जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पोलीस मुख्यालय हॉल मध्ये पार पडणार आहे. आजपर्यंत मराठी पत्रकार परिषदेने अनेक सामाजिक उपक्रम घेतानाच समाजातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन यथोचित सन्मान केला आहे. डॉ शुभांगी बेडेकर या शासकीय रुग्णालयात गेल्या ३ वर्षांपासून प्रसूती विभागात काम करत आहे या कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे, संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असतानाही त्यांनी माता आणि नवजात शिशुसाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे.
जिल्ह्यात कुठेही मनोरुग्ण भटकताना आढळल्यास आज पहिला फोन राजरत्न प्रतिष्ठान ला येतो सचिन शिंदे व त्यांची टीम करत असलेली ही कामगिरी फार मोठी आहे. एकीकडे मनोरुग्णांकडे उपेक्षित नजरेतून पाहिले जाते मात्र ही संस्था या रुग्णांसाठी काही करत आहे आतापर्यंत ६५ मनोरुग्णांना मायेची सावली देत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
या दोन्ही पुरस्कार मानकरी यांचे मराठी पत्रकार परिषद संपुर्ण टीम कडून अभिनंदन करण्यात आले आहे
www.konkantoday.com