मिळकतीच्या जागेत अनधिकृतपणे घूसून गवत आणि जंगली झाडे तोडून नुकसान केल्याप्रकरणी ८जणांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील भोके-निवळी एमआयडीसी येथील मिळकतीच्या जागेत अनधिकृतपणे घूसून गवत आणि जंगली झाडे तोडून नुकसान केल्याप्रकरणी ८जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवार २८ डिसेंबर रोजी सकाळी घडली आहे.
निता सुधाकर सुर्वे (रा.कुवारबांव,रत्नागिरी),चंद्रकांत गोविंद गराटे (रा.गराटेवाडी कुवारबाव) आणि इतर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याविरोधात अनिलकुमार हरिश्चंद्र वेतोसकर (आंबेकरवाडी, भोके-निवळी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com