राज्यांना विश्वासात न घेता, चर्चा न करता केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले -शरद पवार
शेतीसाठी शेतकरी अपार कष्ट करतो. राज्यांचा शेतीत मोठा वाटा असतो. परंतु राज्यांना विश्वासात न घेता, चर्चा न करता केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला. दिल्लीत बसून शेती करता येत नाही हे केंद्राने लक्षात ठेवले पाहिजे, असा हल्लाबोलही शरद पवार यांनी केला
www.konkantoday.com