ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन् गावासाठी ३० लाखांचा निधी मिळवा-आमदार रोहित पवार
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन् गावासाठी ३० लाखांचा निधी मिळवा, अशी घोषणा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खूप मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेवून निवडणुकीसाठी होणाऱया खर्चास फाटा देत गावाच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचविण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांनाही संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावाच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.
www.konkantoday.com