विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्याना राजापूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले
महिनाभरापुर्वी विना परवाना गुरे वाहतुक करणारा टेंम्पो पकडला असतानाच तालुक्यातील पाचल पूर्व परिसरातून परजिल्ह्यात विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्याना राजापूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले आहे. बुधवारी सायंकाळी अणुस्कूरा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महिना भरातील ही दुसरी घटना पुढे आली आहे. त्यामुळे त्यामुळे विनापरवाना गुरे वाहतुक राजरोस सुरूच असून पोलिसांनी या विनापरवाना गुरे वाहतुकीवर ठोस कारवाई करावी अशी मागणी आता पुढे आली आहे.
www.konkantoday.Com