उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम निहाय अर्ज करण्यासमुदतवाढ
सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घेण्याबाबत बुधवारी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रमनिहाय अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिवाय, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा सुधारित वेळापत्रक सुद्धा सीईटी सेल कडून संकेतस्थळावर जाहीर केलं आहे (http://mahacet.org ).
यामध्ये फार्मसी, अभियांत्रिकी (बीई, बीटेक), एमसीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एम ई, हॉटेल मॅनेजमेंट, एलएलबी यासरख्या अभ्यासक्रमच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे
www.konkantoday.com