कनिष्ठ प्रशासक अधिकार्‍यांकडे हजर होण्यासाठी बनावट नियुक्ती पत्रक तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कनिष्ठ प्रशासक अधिकार्‍यांकडे हजर होण्यासाठी बनावट नियुक्ती पत्रक तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बनावट नियुक्ती पत्रक तयार करुन कनिष्ठ प्रशासक अधिकार्‍यांकडे हजर होण्यासाठी नेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार १८ डिसेंबर रोजी दुपारी ११ वा.सुमारास घडली.
सौरभ किशोर पवार (रा.केळवी,ता.राजापूर,जि.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात कनिष्ठ प्रशासक अधिकारी बालाजी विठ्ठलराव कलेटराव यांनी तक्रार केली आहे आहे.त्यानुसार,सौरभ पवार याने जिल्हा निवड समिती अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तसेच जिल्हा परिषद,रत्नागिरीचाही बनावट शिक्का व स्वाक्षरीव्दारे बनावट नियुक्ती पत्रक तयार केले.ते नियुक्ती पत्रक कनिष्ठ प्रशासक अधिकारी कलेटराव यांच्याकडेन नेउन हजर होण्यासाठी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button