कोयनेचे अवजलाचे पाणी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात खेळविल्यास वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल -आ. शेखर निकम यांचे मुख्यमंत्र्याना निवेदन
कोयना वीज प्रकल्पाच्या उभारणीनंतर गेली कित्येक वर्ष कोयनेचे अवजल वाशिष्ठी नदीच्या माध्यमातून अरबी समुद्राला जाऊन मिळत आहे. दरवर्षी ६७ टी.एम.सी. पाणी उचलून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात खेळविल्यास वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल. कोयनेचे अवजल मुंबई किंवा अन्यत्र नेण्यास कोणाचाही विरोध असता कामा नये परंतु ही योजना आखताना कोकणची पाणी टंचाई कशी दूर होईल आणि कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल याचा विचार या योजनेतून प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय आ. निकम यांनी चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजना, चिपळूण कराड रेल्वे मार्गाकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
www.konkantoday.com