कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व पाच महत्त्वाच्या बाजार समित्या आणि अन्य ३०५ बाजार समित्या आज बंद
महाराष्ट्र शेतकऱयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला असून कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात कडेकोट तयारी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व पाच महत्त्वाच्या बाजार समित्या आणि अन्य ३०५ बाजार समित्या आज कडकडीत बंद पाळणार आहेत. संवेदनशील भागात एसटी सेवाही बंद ठेवण्यात येणार असून वीज कामगारांनीही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
www.konkantoday.com