सावकारी कर्जाच्या व्यवहारातून इनोव्हा गाडी आणिरोख रक्कम असा एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

0
40

सावकारी कर्जाच्या व्यवहारातून इनोव्हा गाडी आणिरोख रक्कम असा एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाललांबवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबरमहिन्यात घडली असून याबाबत बुधवार २डिसेंबर रोजी तक्रारदेण्यात आली आहे.
गणेश रामचंद्र शेडगे (रा.पूणे) आणि इतर ५ जणांविरोधात हागुन्हा दाखल करण्यात आला असूनत्यांच्याविरोधात संतोषविश्वनाथ जगदाळे (४०,मुळ रा.गोबगाव पूणे सध्या रा.सिध्दविनायक नगर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिलीआहे.त्यानुसार, २०१८ साली आर्थिक अडचणीमुळे जगदाळे यांनीगणेश शेडगेकडून व्याजाने २५ लाख रुपये घेतले होते.या
कर्जाची परतफेड त्यांनी ५५लाख रुपये देउन केली होती.परंतू
शेडगेकडून आणखी पैशांची मागणी होत होती.यातूनच ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा.सुमारास संतोष
जगदाळे त्यांच्या मालकीच्या इनोव्हा कारवरील चालक समीरठाकूरला पैसे देण्यासाठी मजगाव येथे भाड्याचे पैसे देण्यासाठीआपल्या दुचाकीने गेले होते.त्यांनी समीरला फोन केला असतात्याने काही वेळातच मजगाव येथे येतो असे सांगितले.जगदाळे
समीरची वाट पहात असताना एका स्विफ्ट कारमधून गणेशशेडगे आणि त्याचे ५ साथिदार तिथे आले.त्यांनी संतोष जगदाळेयांना जबरदस्तीने गाडीतून जे.के.फाईल्स चौकात नेउन तिथेपैशांची मागणी केली.जगदाळे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे
सांगून समीरला फोन करुन त्या ठिकाणी बोलावले.काहीवेळाने जगदाळे यांचा चालक समीर ठाकूर इनोव्हागाडीघेउन जे.के.फाईल्स येथे आला.तेव्हा स्विफ्टमधील दोघांनी
इनोव्हा गाडीचा ताबा घेत समीरलाही सोबत घेउन दोन्ही गाड्याहातखंबा येथे घेउन गेले.त्याठिकाणी इनोव्हामध्ये डिझेलभरण्यासाठी गणेश शेडगेने संतोष जगदाळे यांना शिवीगाळ वदमदाटी करत पैशांची मागणी करत त्यांच्या खिशातील १०
हजार रुपये हिसकावून घेतले.डिझेल भरल्यानंतर त्यांनीजगदाळे आणि त्यांचा चालक समीर ठाकूरला परकार
हॉस्पिटलजवळ सोडून संशयित दोन्ही गाड्या घेउन फरारझाले.या सर्व प्रकारामुळे संतोष जगदाळे यांना धक्का बसलाहोता.त्यामुळे ते आपले रहाण्याचे ठिकाणी सारखे बदलत
होते.अखेर या धक्क्यातून सावरल्या नंतर त्यांनी बुधवारी शहरपोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिसनिरीक्षक अनिल लाड करत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here