
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं करोनामुळे निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्यांना दुसऱ्यांदा करोना झाल्याचं बोललं जात आहे. त्रास होत असल्यानं त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
आमदार भारत भालके यांना काही महिन्यांपूर्वी करोना झाला होता. त्यावर त्यांनी उपचाराच्या मदतीने यशस्वीपणे मातही केली होती. मात्र, त्यांना पोस्ट कोविडचा त्रास जाणवू लागला. त्रास होत असल्यानं त्यांना पुण्यातील रुबी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
www.konkantoday.com
