पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतीबा मंदिरातील दर्शनाची वेळ वाढविली
गुढीपाडव्याला मंदिरे खुली झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतीबासह तीन हजारावर मंदिरातील दर्शनाची वेळ वाढविण्यात आल्याचे सोमवारी सांगितले.
आतापर्यंत सकाळी ९ ते १२ या वेळेत मिळणारे दर्शन यापुढे ७ ते १२ या वेळेत घेता येईल. तर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुद्धा दर्शन मिळणार आहे. एकाच वेळी भाविकांची गर्दी होऊ नये. दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी दर्शनाची वेळ वाढवली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
www.konkantoday.com