चिपळूण तालुक्यात गांजा आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू,कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्ठमंडळ पोलिस ठाण्यावर धडकले
चिपळूण तालुक्यात गांजा आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. या नशाबाजीच्या विळख्यात तरूण पिढी सापडून अनेक किशोरवयीन मुले आणि तरुण बरबाद झाले आहेत. अनेकजण त्याच मार्गावर आहेत. गांजी विक्रीवर कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्ठमंडळ पोलिस ठाण्यावर धडकले.याबाबत काही ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रकारांची तक्रार करणार्या नागरिकांना मात्र ‘नेमकी ठिकाणे दाखवा, कारवाई करू’, असे घोटीव उत्तर पोलिस अधिकार्यांकडून ऐकायला मिळाले. त्यानंतर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शौकत मुकादम यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मुकादम हे राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ घेवून आज पोलिस ठाण्यावर धडकले. तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कांँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहरप्रमुख मिलिंद कापडी, क्षेत्रप्रमुख एकनाथ साळवी, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सनी आरेकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com