जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार
जिल्हा परिषदेतील विविध समस्यांबाबत दोन आठवड्यापूर्वी अध्यक्ष रोहन बने यांनी केलेल्या मंत्रालयातील वारीचे फळ लवकरच पदरात पडणार आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून पावले उचलली आहेत. पोर्टलद्वारे भरतीअतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.
अध्यक्ष रोहन बने यांनी ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यासाठी त्यांनी दोनवेळा मंत्रालयाची वारी केली होती. शिक्षण विभागात शिक्षकांची असलेली रिक्त पदे भरावीत, यासाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे घातले होते.
www.konkantoday.com