रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर अचानक मेरीटाईम बोर्डाने कारवाई करत बंदी घातली

0
26

एकीकडे देवस्थाने ,पर्यटनस्थळे खुली केली असतानाच कोरोनाचे कारण देत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर अचानक मेरीटाईम बोर्डाने कारवाई करत बंदी घातली. बंदी घातल्याने वॉटरस्पोर्टस्‌ चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. गणपतीपुळेसह जिल्ह्यातील १७ स्पीड बोटींसह ५ वॉटर स्कूटर चालकांना फटका बसला.
गणपतीपुळेत १७ बोटी असून ५ स्कूटरचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर शासनाने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. त्याचा फायदा घेऊन बिघडलेली आर्थिक घडी सुधारण्याची संधी व्यावसायिकांना मिळाली होती परंतु बंदी घातल्याने व्यावसायिक च्यात नाराजी पसरली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here