दापोली येथे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव ! आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांची माहिती

0
37

दापोली – रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे मेडिकल कॉलेज व्हावे यासाठीचा प्रस्ताव करून उच्च पातळीवर निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा,प्रांताधिकारी शरद पवार, डॉ. महेश भागवत आदी उपस्थित होते. येथील विद्यमान आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी आपल्याकडे आज तशी मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज मंजूर असताना १५० कि. मी.च्या आतमध्ये रत्नागिरी येथे हे कॉलेज होण्यापेक्षा दापोली हाच योग्य सेंटर पॉइंट आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी येथील आमदार योगेश कदम यांनीही तसा पाठपुरावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे करावा याचा निर्णय आम्ही उच्च पातळीवर घेऊ अशी माहितीही ना. टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here