कौन बनेगा करोडपती मधे २५ लाखाची लॉटरी लागली असे सांगून महिलेची पाच लाखांची फसवणूक
रत्नागिरी शहरातील गवळी वाडा येथील राहणाऱ्या सौ.कैसरबानू काजी ह्यांची केबीसी मध्ये २५ लाखाची लॉटरी लागली आहे असे सांगून त्यांचेकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे
काजी यांना त्यांच्या व्हाट्सअप वर मेसेज आला की केबीसी मधून तुम्हाला २५ लाख रुपयाची लॉटरी लागली आहे सोबत एक व्हिडिओ देखील व्हाट्सअप वर पाठवण्यात आला काजी यांना आपण बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगून तोतया इसमाने त्यांना तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगितले त्यामुळे काझी यांचा त्यावर विश्वास बसला यानंतर आरोपीने मोबाईलवर फोन करून कन्वर्ट चार्जेस, जीएसटी , सीबीआय तपासणी आदीसाठी पैसे लागणार आहेत त्यासाठी त्यांनी काझी यांच्याकडून विविध कारणे सांगून पाच लाख लाख रुपयाची रक्कम उकळली त्यानंतर त्यांना लॉटरीची कोणतीही रक्कम मिळाली नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आकाश वर्मा ,अनिल कुमार यादव ,नंदकिशोर पासवान या अज्ञात लोकांच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com