आवाशीत महामार्गालगतच्या गटारात रासायनिक सांडपाणी; स्थानिकांमधून संतापाची लाट

0
23

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीचे सांडपाणी रस्त्यालगतच्या गटारात सोडले जात असल्याने उघड झाले असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार करूनही उघडण्यावर सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नसल्याने प्रदुषणाला कंटाळलेले स्थानिक आता उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील आवाशी येथील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगतच्या गटारातून उग्र वासाचे रासायनिक सांडपाणी वहात असल्याचे येथील अमीत आंब्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून गटारातून वाहणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची पाहणी केली. गटारातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा रंग हिरवा असल्याने हे पाणी कोणत्यातरी रंगाच्या कारखान्याचे असून ते पाणी कोणत्यातरी वाहनाने गटारात सोडले असावे या निष्कर्षापर्यंत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पोहचले. तक्रार करणाऱ्या स्थानिक युवकांना या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार देण्याची सुचना केल्यानंतर अमित आंब्रे व त्याच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दिली. मात्र त्यानंतरही त्याच गटारात रंगमिश्रीत उग्र वासाचे सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरुच राहिल्याने रासायनिक उत्पन्न घेणाऱ्या कंपन्यांना आता कुणाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर किंवा नजीकच्या नाल्यात सोडण्याच्या अनेक तक्रारी आहेत. येथील रासायनिक पाण्यामुळे नैसर्गिक जलस्रोत दुषीत होवून काहींचा जीवही धोक्यात आलेला आहे. सांडपाण्यामुळे जलप्रदुषण होवून दाभोळ खाडीतील मासे मरण्याच्या घटना वारंवार घडतच आहेत. रासायनिक कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या वायु आणिजलप्रदुषणार्मुळे परिसरातील ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आता उघड्यावर रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here