
मुख्यमंत्री निधीकडून कोकणाला ठेंगा दाखवून उपेक्षा करण्यात आली-भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांचा आरोप
कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्हा रुग्णालयांना २७९ व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री निधीकडून रुग्णालयांना काहीही मदत देण्यात आली नाही. केवळ रत्नागिरी येथील कोरोना आरटीपीसीआर लॅबसाठी दिलेले १ कोटी ७ लाख रुपये वगळता मुख्यमंत्री निधीकडून कोकणाला ठेंगा दाखवून उपेक्षा करण्यात आली, याकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्ह्यात कोणती मदत व साहित्य पुरविण्यात आले, याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती मागविली होती.
www.konkantoday.com