ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला तब्बल आठ महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला तब्बल आठ महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. मंगळवारी जिल्हाधिकार्यांनी या बाबतचे आदेश जारी केल्यानंतर बुधवारपासून किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिक तसेच पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या.परंतु किल्ले सिंधुदुर्ग व किल्ले विजयदुर्ग मात्र, पर्यटकांसाठी खुले करण्यात आले नव्हते. येथील सर्व व्यवसाय हे पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असल्याने पर्यटकांअभावी व्यवसाय ठप्प झाले होते.
www.konkantoday.com