शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर होणार महाविकास आघाडी
राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या तीन मित्रपक्षांमध्ये लवकरच महाविकास आघाडी होण्याचे संकेत प्र्राप्त झाले आहेत. नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले
पालकमंत्री ना. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, कॉंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी रमेश कीर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात एक खास बैठक झाली या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यामध्ये तिन्ही पक्षांना सामावून घेतल्यानंतरच महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
www.konkantoday.com