नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगला विद्यापीठाची मान्यता
नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगला विद्यापीठाची मान्यता
लोवले (संगमेश्वर) येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगला मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, इंडियन नर्सिंग कौन्सिल यांच्याशी हे महाविद्यालय संलग्न राहणार असल्याची माहिती प्राचार्या सौ. प्रज्ञा कदम यांनी दिली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या प्रयत्नातून लोवले संकुलात नर्सिंग महाविद्यालय सुरू झाले आहे. इ. बारावी पास, नीट परीक्षा उत्तीर्ण असलल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हमखास नोकरी मिळवून देणार्या नर्सिंग क्षेत्रात प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मुलींना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com