प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींनी घरीच थांबण्याचा सल्ला
प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींनी घरीच थांबावे, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी धार्मिकस्थळांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन करणाऱ्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने शनिवारी जारी केल्या. या सूचनांचे धार्मिकस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी कठोर पालन करावे, असेही बजावण्यात आले आहे.
www.konkantoday.com