भाजप संगमेश्वरतर्फे डिंगणी येथे २०० कुटुंबाना दिवाळी भेट

0
144

संगमेश्वर: तालुक्यातील डिंगणी येथे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी संगमेश्वर भाजपच्या पदाधिकारी व दानशूर नागरिकांच्यावतीने ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याच्या हेतूने शुभेच्छा देताना सोबत दिवाळी भेटही दिली. “शिवभावे जीवसेवा” हे स्वामी विवेकानंदांचे वचन प्रत्यक्षात आणण्यासाठी संगमेश्वर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील आहे हे वारंवार अधोरेखित होत आहे.
कोरोना काळात केंद्र शासनाने काळजीपोटी केलेल्या अभूतपूर्व लॉक डाऊननंतर गावातील ग्रामस्थांची आर्थिक स्थिती बिघडली होती. अशात तालुका उपाध्यक्ष श्री. मिथुन निकम यांच्या नेतृत्वात वारंवार गावात समाजोपयोगी कार्यक्रम राबवले गेले. यात सुरुवातीस २२५ कुटुंबांना केलेले अन्नधान्य वाटपादी गोष्टी ग्रामस्थांच्या आजही स्मरणात आहेत.
‘पार्टी विथ डिफ्रन्स’ अशी बिरुदावली लावणारा भाजप पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेण्यास, कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास आवश्यक ती सर्व मदत करतो. भाजप सत्ता प्राप्त करणे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानून कार्य करणारा पक्ष आहे. त्यामुळे आमचे पदाधिकारी नियमितपणे सामाजिक कार्यासाठी विविध मार्गांनी प्रोत्साहन प्रोत्साहन देतात असे श्री. निकम यावेळी म्हणाले. याचे सर्वोत्तम उदारहण म्हणजे भाजप द. रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सूर्यकांत साळुंखे साहेब. साळुंखे साहेबांनी या उपक्रमाची माहिती देताच आम्हांला तातडीने अर्थसहाय्य केले आणि तेही एका फोनवर. एक कार्यकर्ता म्हणुन आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू अशी भावना याप्रसंगी निकम यांनी व्यक्त केली.
भाजप आणि जनतेचा फक्त निवडणुकीपुरता संबंध नसून जनता हेच भाजपचे कुटुंब आहे. आणि कुटुंबातील सदस्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे; ज्यास आम्ही कधीही चुकणार नाही. अशा समाजोपयोगी कार्यक्रमांना संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव साहेब, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व हॉटेल गिरीराजचे मालक रुपेशजी कदम, विनोद म्हस्के, संगमेश्वर तालुका सरचिटणीस अमितजी ताठरे यांचे नेहमीच सहकार्य लाभते असे उपसरपंच मिथुन निकम यांनी सांगितले. शिवाय डिंगणी येथील कार्यकर्त्यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here