
चिपळुणात यंदा दिवाळी पहाट हा कार्यक्रम सांस्कृतिक केंद्रासमोरील बंद दरवाजासमोर सादर करणार
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी चिपळूणमधील नाट्यकर्मी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी सांस्कृतिक केंद्रासमोर एकत्र आले होते. आता सांस्कृतिक केंद्र कधी सुरू होणार, याची वाट पाहायची नाही, निवेदने द्यायची नाहीत, तर यंदा दिवाळी पहाट हा कार्यक्रम सांस्कृतिक केंद्रासमोरील बंद दरवाजासमोर सादर करायचा. रसिक प्रेक्षकांच्याच उपस्थितीत बंद सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करायचे, असा महत्त्वपूर्ण निर्णय नाट्यकर्मींनी घेतला आहे.
शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ कार्ले, दिलीप आंब्रे, अभय दांडेकर, नाट्य संयोजक सुनील जोशी, सतीश कदम, संतोष केतकर, योगेश बांडागळे, कैसर देसाई हे सांस्कृतिक केंद्रासमोर एकत्र आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला
www.konkantoday.com