
महिलांचे प्रश्न आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
राज्यात महिलांच्या विकासाला गती देण्याची आवश्यकता आहे. महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचे प्रश्न आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच या कक्षामार्फत महिलांच्या योजनांना गती देणे, सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यावरही काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते
www.konkantoday.com




