शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार

0
184

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्दत आहे.त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here