
मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणार्या रत्नागिरी पालिकेतील १६ कर्मचार्यांचा सत्कार
मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणार्या रत्नागिरी पालिकेतील १६ कर्मचार्यांचा कोविडयोद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. लायनेस क्लब ऑफ रत्नागिरी, मनशक्ती केंद्र लोणावळा शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पालिका सभागृहात १६ कर्मचार्यांना कोविड योद्धा पुरस्कार म्हणून सोलापुरी चादरी, श्रीफळ, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्याची आव्हानात्मक जबाबदारी एप्रिल महिन्यापासून पालिकेतील कर्मचार्यांनी कर्तव्याच्या भूमिकेतून पार पाडली आहे.
लायनेस क्लबच्या सदस्या सायुजा प्रभावळकर यांच्या संकल्पनेतून कोरोनायोद्ध्यांना गौरविण्यात आले. लायनेस क्लब अध्यक्षा ऍड. कार्तिक शिंदे, सेक्रेटरी शामल शेठ, खजिनदार नेहा साळवी, सायुजा प्रभावळकर, सौ. अंजली प्रभावळकर, मनशक्ती केंद्राच्या शाखेचे प्रमुख राजन नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालिका कर्मचारी जितेंद्र विचारे यांनी सत्काराला उत्तर देताना कोविडयोद्ध्यांचा गौरव केल्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
www.konkantoday.com