सर्व्हर हल्ल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आज
सर्व्हर हल्ल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमच्या परीक्षेस सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचा दावा केला आहे. दहा हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याने सर्वांचे लक्ष या परीक्षांकडे लागून राहिले आहे.
मुंबई विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार तृतीय वर्ष बीएची परीक्षा सकाळी तर तृतीय वर्ष बीकॉमची परीक्षा दुपारी होत आहे. या दोन्हीही परीक्षा ऑनलाइन होत आहेत.
www.konkantoday.com