राज्यात चोवीस तासांत ६,०५९ करोनाबाधितांची नोंद
राज्यात चोवीस तासांत ६,०५९ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५,६४८ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ही १६,४५,०२० वर पोहोचली असून यांपैकी १४,६०,७५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजवर ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १,४०,४८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सध्याचा मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे
www.konkantoday.com