
सौ.स्नेहल संतोष पावरी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० जाहीर
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. या मध्ये अनेक विभागातील मान्यवरांचा समावेश असतो. रत्नागिरी जिल्ह्यातून. सौ.गोदुताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून व 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या युनिट मध्ये फर्स्ट ऑफिसर (एन एन सी )ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या सौ.स्नेहल संतोष पावरी यांना सन 2020 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २४/११/२०२० रोजी मुंबई येथे होणार आहे.
स्नेहल पावरी या दर्यावर्दी प्रतिष्ठान महिला मंडळ,पालशेत या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या सचिव म्हणून काम करत असताना महिलांसाठी अनेक पद्धतीने जनजागृतीचे काम करत आहेत.त्यांच्या
सामाजिक व शैक्षिणक कामामुळे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थानीही त्यांना विविध पुरस्कारानी सन्मानित केले आहे. यामध्ये सन २०१० व २०१४ मध्ये रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीच्या तर्फे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य पुरस्कार, सन २०१२ मध्ये जागतिक महिला दिनी – समाजभुषण पुरस्कार, सन २०१२ मध्ये यूनियन बैंक ऑफ़ इंडियाचा स्टार परफॉरमन्स पुरस्कार, सन २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ अधिवेशनात सन्मान, ऑक्टोबर,२०१९- मध्ये राष्ट्र सेविका समिती,रत्नागिरी च्या वतिने रत्नकोंदन पुरस्कार, १४ डिसें २०१९ मध्ये -अ.भा.वि.प.च्या तिरंगायात्रा समारोप कार्यक्रमात कर्तुत्ववान नारी पुरस्कार , ०६जाने.२०२०- मध्ये दाभोळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे माजी विद्यार्थी सन्मान , १९ जाने.२०२०- मध्ये खारवी समाज सेवा मंडळ,मुंबई तर्फे विशेष शैक्षणिक कार्य सन्मान, १९ जाने.२०२०- मध्ये रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघा तर्फे विशेष शैक्षणिक कार्य सन्मान, १६ फेब्रु.२०२०- मध्ये खारवी समाज विकास समिती रत्नागिरी तालुका तर्फे विशेष शैक्षणिक कार्य सन्मान, ०८ मार्च.२०२०- मध्ये रत्नागिरी नगर परिषद तर्फे ,जागतिक महिला दिनी आदर्श महिला पुरस्कार त्याचबरोबर, एफ / ओ. स्नेहल पवारी यांना एनसीसी अधिकारी म्हणूनही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात 6 महाराष्ट्र् बटालियन कोल्हापूर युनिट मधून कोल्हापूर ग्रुप मध्ये सन २०१०-११ मध्ये कोल्हापूर येथील कॅम्प येथे उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार. सन २०१४ -१५ व सन २०१८-१९ च्या सर्वोत्कृष्ट एन सी सी अधिकारी( ए .एन .ओ.) पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनी परेड कार्यक्रम रत्नागिरी येथे उत्कृष्ट संचलन मार्गदशक परस्कारानेही सन्मानित करण्यात आले .
अशा कर्तव्य भावनेने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाची / सेवेची दाखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ने घेतली असून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. सौ स्नेहल पावरी यांच्या यशामुळे सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com