सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षी पासून प्रवेश सुरू -नामदार उदय सामंत

0
17

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षी प्रवेश सुरू व्हावेत, यादृष्टीने प्रयत्न आहेत. येत्या आठ दिवसांत आवश्‍यक कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनीदिली.
पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून जिल्ह्यात रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लावल्याचे सांगून पालकमंत्री सामंत म्हणाले, “”गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, मागणी पूर्ण झाली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्याचे संकेत दिले होते. ते पूर्ण करत सध्याच्या कोरोनाच्या काळातही शासकीय वैद्यकीय महाविद्याल मंजूर करण्याचे काम राज्य शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या पद निर्मितीचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे. असे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here