चिपळूण शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद,पिसाळलेल्या कुत्र्याचा ११जणांना चावा

0
18

चिपळूणशहर व परिसरात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतली परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ११जणांचा चावा घेत जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांबरोबरच गुरे, गाढवे यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. चिपळूण शहरात ठीक-ठिकाणी होणारी विक्री, उघड्यावर फेकण्यात येणारा कचरा, भाजीपाला, यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here